चेन्नई – देशात अनेक दिवसांपासून करोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान करोनाचा प्रादुर्भाव कमी होत जात असल्याकारणाने लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता देण्यात आली आहे. लॉकडाऊनचा अनेकांना सामना करावा लागला आहे. लॉकडाऊन दरम्यान तळीरामांची सुद्धा मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे.
दारुची दुकानं उघडण्याचा तळीरामांना झाला ऐवढा आनंद, केले असे काही… (व्हिडिओ)
दारुची दुकानं उघडण्याचा तळीरामांना झाला ऐवढा आनंद, केले असे काही… (व्हिडिओ) pic.twitter.com/gPQUJZfauE— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 15, 2021
तमिळनाडूमधून असाच एक तळीरामांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेथील सरकारने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली असून दारुची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. यामुळे तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले आहे. नियमांमध्ये शिथीलता आणताच दारुच्या दुकानांवर एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तामिळनाडूनधील एका व्यक्तीला दारुचे दुकान उघडल्याचा इतका आनंद झाली, की तो आधी दुकानाच्या बाहेर दिवा लावतो. यानंतर काउंटरवर जाऊन दोन बाटल्या विकत घेतो आणि अग्निदेवताच्या समक्ष त्यांचं दर्शन घेतो. यानंतरच तो दारु पिण्याचा आनंद घेतो. त्याला पाहून दुसराही एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि या पुजेमध्ये त्याला साथ देतो. सद्ध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.