बाळाचे प्राण वाचवण्यासाठी गाडीवरून घेतली उडी; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Madhuvan

अनेकदा आपण चित्रपटांमध्ये नायकाला इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावताना पाहत असतो. पडद्यावरचा थरार काल्पनिक असल्याचं माहिती असतानाही नायकाची अशी कृती आपल्याला भारावून सोडते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सिसिटीव्ह फुटेजमुळे आता तुम्हाला रिअल लाईफमध्ये घडलेली एक थरारक घटना प्रत्यक्ष अनुभवायला भेटणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. या व्हिडिओत दुचाकीवरून चाललेल्या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे एका बालकाचे प्राण वाचल्याचं दिसतय.

व्हिडिओमध्ये, उतरंड असलेल्या रस्त्यावरून एक वॉकर घसरत येताना दिसतो. पुढच्याच क्षणी वॉकर उताराने घसरत जात असताना उताराच्या बाजूने एक तरुण दुचाकीवरून चालल्याचं दिसतं. वॉकर उताराने घसरत जात असल्याचं त्या दुचाकीस्वाराच्या लक्षात येत. तोपर्यंत वॉकरने वेग पकडलेला असतो. मात्र तरुण क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवरून अक्षरशः उडी घेत वॉकरच्या दिशेने धाव घेतो.

तरुणाने वेळीच धाव घेतल्याने तो वॉकरला थांबवू शकतो. तेव्हड्यात मागून वॉकरमध्ये बसलेल्या बाळाची आई अथवा नातेवाईक धावत येऊन बाळाला उचलून घेत छातीला लावते. 

दरम्यान, तरुणाने दाखवलेल्या या प्रसंगवधानामुळे त्या लहानग्याला सुखरूप वाचवता आले आहे. तरुणाच्या या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 14 सप्टेंबर रोजी कोलंबियाच्या फ्लॉरेन्सिया शहरातील रिनकॉन दे ला एस्ट्रेला परिसरामध्ये घडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.