निलगिरी – इंसान सबसे बड़ा जानवर होता है, असा डायलॉग एका चित्रपटातील आहे. या डायलॉगची प्रचिती तामिळनाडूमध्ये आली आहे. तामिळनाडूमध्ये एका हत्तीसोबत धक्कदायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील मसिनागुडीच्या रहिवासी परिसरात अन्नाच्या शोधात आलेल्या एका जंगली हत्तीवर अज्ञात व्यक्तीने जळता टायर फेकला. यामुळे हत्तीच्या कानात गंभीर इजा झाली. वन अधिकाऱ्यांनी हत्तीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, रक्तस्त्राव जास्त झाल्याने १८ जानेवारी रोजी हत्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
What a shame. Such inhumanity. Such cruelty. #ElephantDeath pic.twitter.com/dfy5PQ06FG
— Jason Pereira (@Jasonpereira21) January 23, 2021
दरम्यान, माणसांच्या क्रूरतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटत आहेत.