दक्षिण कन्नड (कर्नाटक) : आपल्या वहिनी आणि पुतणीवर ऍसिड टाकून जखमी करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. हा संशयित 55 वर्षाचा असून त्याने शनिवारी सकाळी हा भीषण प्रकार केला.
हल्ला झालेली महिला 35 वर्षीूय असून हल्लेखोराच्या भावाशी तिचा विवाह झाला होता. तिच्या पतीने एका सहकारी बॅंकेकडून 2081 मध्ये पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचे दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे ते पुढचे हप्ते भरू शकले नाहीत.
बॅंकेने नोटीस बजावल्यानंतर हा आरोपी संतापला. या महिलेच्या घरी येऊन त्या महिलेला शिविगाळ करू लागला. सोबत आणलेले ऍसिड त्याने ही महिला आणि एका मुलीवर टाकले. त्यात त्या दोघी जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.