कोलकत्ता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिलाडी अक्षय कुमारने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरीही त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याचे सांगितले. आणि ममता दीदी प्रत्येक वर्षी मला दोन कुर्ते आणि मिठाई पाठवितात, असेही मोदींनी सांगितले. यावर आता ममता बॅनर्जींनी पलटवार केला आहे. मी जरी मिठाई आणि कुर्ते पाठवत असले तरीही अशा लोकांना मत देत नाही, अशी टीका ममता बॅनर्जींनी मोदींचे नाव न घेता केली.
हुगळी जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, मी लोकांना रसगुल्ला पाठविते. पूजेदरम्यान भेटवस्तूही पाठविते आणि चहाही देते. परंतु मी त्यांना एकही मत देत नाही, असे त्यांनी सांगितले.