Mamta Kulkarni : 90 च्या दशकात खळबळ माजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही किंवा ती सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाही. मात्र, चाहते ममताची आठवण तिच्या चित्रपट आणि गाण्यांमधून करतात. दरम्यान, आता ममता तब्बल 25 वर्षांनी भारतात आली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती सांगत आहे की, 25 वर्षांनी आपल्या देशात परतल्यानंतर ती खूप भावूक झाली आहे. ‘नमस्कार मित्रांनो, 25 वर्षांनंतर मी भारतात, मुंबई, आमची मुंबईत आले आहे.
मी 2000 मध्ये भारताबाहेरील माझ्या संपूर्ण प्रवासाबद्दल खूप भावनिक आहे आणि आता 2024 मध्ये मी येथे आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. मला ते कसे व्यक्त करावे हे माहित नाही, मी भावनिक आहे’. असं ती म्हणाली.
View this post on Instagram
ममता कुलकर्णी व्हिडिओमध्ये पुढे म्हणाली, ‘फ्लाइट लँड करण्यापूर्वी मी माझ्या आजूबाजूला पाहिले. वर्षांनंतर मी माझा देश वरून पाहिला, तो काळ माझ्यासाठी खूप खास होता. मी भावूक झाले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. विमानतळावर पाय ठेवल्यावर मला धन्य वाटले.
हा व्हिडिओ शेअर करताना ममताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ’25 वर्षांनी माझ्या मातृभूमीत परतले, 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर 2012 च्या कुंभमेळ्यात सहभागी झाले आणि 12 वर्षांनंतर मी 2025 मध्ये दुसऱ्या महाकुंभासाठी परतले आहे.’ आता अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ममता कुलकर्णीच्या चाहत्यांना भारतात परतताना पाहून खूप आनंद झाला आहे. व्हिडीओवर कमेंट करून चाहते त्याचे देशात स्वागत करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूप दिवसांनी तुम्हाला पाहून खूप आनंद झाला.’ याशिवाय तिने मुंबईत येऊन मराठीत बोलले असते तर बरे झाले असते, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.