आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींवर ममतांचा ‘सुपर इमर्जन्सी’चा वार

नवी दिल्ली – 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज  44 वर्षे पूर्ण झाली. आणीबाणीच्या  घटनेवर प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी आणीबाणीवरून कॉंग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती मात्र मागील 5 वर्षात देशात सुपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सा्ंगितले आहे. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं हिंसाचार वाढला होता. पश्चिम बंगालचे भाजपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रॅली काढत होते. जमावबंदी लागू असतानाही ममता सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.