ममता भाजपाविरोधात लढा चालूच ठेवणार

कोलकाता – पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय स्तरावर अनेक मोठे बदल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. यासंबंधी 31 रोजी त्यांनी अंतिम समीक्षा बैठक बोलाविली आहे.

भाचा अभिषेक बॅनर्जी याच्याकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजप आव्हान उभे करणार हे आता स्पष्ट झाले आहे.

तृणमूलचे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले सौगत रॉय यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाची संभाव्य हानी टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करण्याची योजना तृणमूल कॉंग्रेसने आखली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.