कोलकाता – नंदीग्राम मधील प्रचारावेळी जखमी झाल्यानंतर चार दिवसांनंतर आज प्रथमच पश्चिम बंगालच्या प्रमुख ममता बॅनर्जी या तेथील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्या. त्यांच्या पायाला मोठी जखमी झाली असल्याने त्या व्हील चेअरवरून कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या पाच किमी लांबीच्या रोड शोला स्थानिक नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला.
या प्रचाराला निघण्यापुर्वीे त्यांनी ट्विटरवर जो संदेश प्रसारीत केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही अत्यंत धैर्याने हा लढा सुरूच ठेवणार आहोत. मला अजूनही जखमांच्या वेदना होत आहेत, पण लोकांच्या वेदना माझ्यासाठी अधिक महत्वाच्या आहेत.
त्यांच्या या रोड शो निमीत्त तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी शहरात त्यांचा डॉटर ऑफ बंगाल असा उल्लेख करणारी पोस्टर्स ठिकठिकाणी लावली होती.
We will continue to fight boldly!
I’m still in a lot of pain, but I feel the pain of my people even more.
In this fight to protect our revered land, we have suffered a lot and will suffer more but we will NEVER bow down to COWARDICE!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 14, 2021