मिसेस इंडिया स्पर्धेत ममता ओसवालने पटकावले मानाचे किताब

कोल्हापूर- कोल्हापुरच्या अनेक कलाकारांनी विविध क्षेत्रात गुणवत्तेच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवलाय यामध्येचं सौंदर्य स्पर्धांचे क्षेत्रही काबीज करत कोल्हापूरच्या अनेक सादयवताना जापल्या बुध्दीमत्तेची मोहर सौंदर्य स्पर्धांवर उमटवली आहे. ही परंपरा आणखी पुढे नेली आहे. ती कोल्हापुरच्या ममता ओसवाल यांनी. पुणे येथे नुकत्याच झालेल्या मिसेस इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील स्पधेत ममता ओसवाल यांनी दोन किताब पटकावत कोल्हापूरच्या परंपरेवर मानाचा तुरा खोवलाय.

कोल्हापुरातील बाबुजमाल परिसरात राहणाऱ्या ममता प्रकाश ओसवाल या विवाहीत आहेत. पती आणि तीन मुलांसह त्या गुजरीजवळ धुंघट साडीज हे महिलांसाठीचे कपडयांचे दालन चालवतात. साडी विक्रीचा व्यवसाय करत असतानाच ममता यांनी मॉडेलिंग, अभिनय आणि सौंदर्य स्पर्धांची आवड जोपासली. मात्र मुलांचं संगोपन आणि व्यवसायामुळं त्यांना या छंदासाठी वेळ मिळाल नव्हता. या पार्श्वभूमीवर पुणे येथे दिवा मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील मिसेस इंडिया स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांना मिळाली. ममता यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. २८ जुलै रोजी पुण्यासह देशभर निवड चाचणी घेण्यात आली. पुण्यातील ऑडीशन राऊंडला उपस्थित राहून, ममता यांनी आपल्या कौशल्याची चुणुक दाखवली. देशभरातील स्पर्धकांमधून ममता यांची फायनल फेरीसाठी निवड झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अंतिम फेरी संपन्न झाली. यामध्ये सहभागी स्पर्धकांना चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर टॅलेंट राऊंड आणि फायनल राऊंड संपन्न झाला. पुण्यातील फाईव्हस्टार हयात हॉटेलमध्ये झालेल्या या अंतिम फेरीसाठी देशभरातील ४२ सौंदर्यवतींना निवडण्यात आले होते. त्यांचे व्यक्तीमत्व, गुणवत्ता, विविध विषयांवर विचार मांडण्याची पध्दत, चालणे, बोलणे, हावभाव अशा सर्व गुणांचा विचार करून, विजेत्यांची नावं घोषीत करण्यात आली. त्यामध्ये ममता ओसवाल यांनी क्विन ऑफ वेस्ट आणि मिसेस कॅटवॉक असे दोन मानाचे किताब पटकावले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून अश्मित पटेल आणि अभिनेत्री अदिती गोवीत्रकर यांनी काम पाहीले. परिक्षकांच्या हस्ते ममता ओसवाल यांना क्राऊन देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेचे संयोजन अंजना मास्कहरेनस आणि कार्ल मास्कहरेनस यांनी केले. एकूणच कुटुंब आणि व्यवसाय सांभाळत असतानाही जिद्द, मेहनत आणि परिश्रमाच्या बळावर यशाचा मुकुट पटकावता येवू शकतो, हे ममता ओसवाल यांनी सिध्द केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)