Mamata Kulkarni | अभिनेत्री ममता कुलकर्णीने 90चे दशक चांगलेच गाजवले. बॉलिवूडमधील करिअरप्रमाणे ममताचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिले. तब्बल 24 वर्षांनंतर ती मुंबईत परतली आहे. ज्याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती खूप भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ममता कुलकर्णी व्हिडिओत म्हणते की, “नमस्कार, मी ममता कुलकर्णी. मी नुकतीच भारतात, मुंबईत आली आहे. मुंबई आमची मुंबई! जवळपास 24 वर्षानंतर मी मायदेशी परतले. त्यामुळे माझ्या भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत. 2000 साली मी भारत सोडून परदेशी स्थायिक झाले. आता मुंबईत आल्यानंतर मी खूपच भावुक झाले. माझ्या मनातील भावना मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. जेव्हा विमान लॅंडिग झालं.त्यानंतर मी माझ्या आजुबाजूला पाहिलं. २४ वर्षानंतर देशाचा झालेला कायापालट पाहून मी भारावून गेले. माझ्या देशाची झालेली प्रगती पाहून मला खूपच आनंद झाला आहे,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे ती म्हणते की , “मुंबई एअरपोर्ट बाहेरील दृश्ये पाहून माझ्या डोळ्यात अश्रु आले. मी खरोखर खूप आनंदी आहे आणि ते कसे व्यक्त करावे हे मला माहित नाही. मी भावनिक आहे. खरं तर, जेव्हा फ्लाइट लँड होते किंवा फ्लाइट लँड होण्यापूर्वी, मी माझ्या डावीकडे आणि उजवीकडे पाहत होतो. आणि मी वरून माझा देश पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी पुन्हा भारावून गेले.” मात्र, भारतात परतण्याचे कारण ममताने सांगितले नाही. Mamata Kulkarni |
View this post on Instagram
क्रांतिवीर, राम लखन, वक्त हमारा है, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, तिरंगाआणि बाजी यांसारख्या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये ममता दिसली. 2002 मध्ये तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. 1995 मधील करण अर्जुन चित्रपट सुपरहिट ठरला होता. ज्यात शाहरुख खान, सलमान खान आणि काजोल देखील होते. Mamata Kulkarni |
यापूर्वी अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. 2002 साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी तिचे नाव 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमधील एक आरोपी म्हणून नोंदवले होते. Mamata Kulkarni |
हेही वाचा: