ममतादीदींचा युटर्न; मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यास नकार 

कोलकत्ता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाआधी राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार होत्या. परंतु, ममता यांनी मोदींना पत्र लिहीत समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. या समारंभासाठी भाजपने पश्चिम बंगालमधील हिंसाचारादरम्यान मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही निमंत्रण दिले आहे. आणि त्याला राजकीय हत्या म्हंटले आहे. परंतु, ममता यांनी ही राजकीय हत्या नसून आपापसातील वादाचे प्रकरण आहे, असे म्हंटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी म्हंटले कि, नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन. तुमचे संविधानिक आमंत्रण मी स्वीकार केले होते. आणि शपथविधी समारंभास उपस्थित राहण्यास तयारही होते. परंतु, मागील काही तासांमध्ये मी वृत्त पाहिले कि, भारतीय जनता पक्ष त्या ५४ कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण देणार आहे. ज्यांची बंगालमध्ये राजकीय हत्या करण्यात आली आहे. हे पूर्णतः असत्य आहे. बंगालमध्ये कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. या हत्या आपापसातील वाद, कौटुंबिक वाद आणि अन्य कारणांमुळे झाली आहे. या प्रकरणाचा राजकारणाशी काहीही देणे-घेणे नाही. तसेच कोणत्याही रेकॉर्डमध्येही हे उपलब्ध नाही.

त्या पुढे  म्हणाल्या, सॉरी नरेंद्र मोदीजी याच कारणामुळे मी तुमच्या शपथविधी समारंभास सहभागी होऊ शकत नाही. हा समारंभ लोकशाही उत्सव साजरा करणार होता. परंतु, कोणत्याही एका राजकीय दलाला खालच्या पातळीवरचे दाखविण्याकरिता नाही. कृपया मला क्षमा करावे, असे त्यांनी म्हणले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते मृत्युमुखी पडले होते. त्यांना भाजप शहीद म्हणत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)