-->

“…तर ममता बॅनर्जींनी आताच लेटर पॅडवर माजी मुख्यमंत्री छापून घ्यावे”

मेदिनीपूर – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर राज्यात भाजपने कडवं आव्हान उभं केलं आहे. अशातच काल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू धर्माधिकारी यांचा मतदारसंघ असलेल्या नंदिग्राममधून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होत. ममता यांनी नंदिग्राममधून उमेदवारी घोषित केल्याने हा भाजपवासी झालेल्या सुवेंदू धर्माधिकारी यांना थेट इशारा मानला जात आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून उमेदवारी घोषित केल्यानंतर सुवेंदू यांनी देखील दंड थोपटले आहेत. ममताच्या घोषणेवर टिपणी करताना सुवेंदू यांनी, ‘ममता यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांनी आतापासूनच आपल्या नावाभोवती माजी मुख्यमंत्री लिहलेलं लेटर पॅड तयार ठेवावं.’ असा घणाघात केला. ते मेदिनीपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये बोलत होते.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

नंदीग्रामशी माझे भावनिक नाते आहे आणि कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात मी नंदीग्राम मधूनच केली आहे. त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून तृणमुल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुव्रत बक्षी यांनी माझ्या उमेदवारीला अनुमती द्यावी अशी विनंतीही त्यांनी त्यांना केली. यावेळी स्वता बक्षी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी तातडीने ही विनंती मान्य करण्यात आल्याचे घोषित केले. नंदीग्राम हे ठिकाण टाटांच्या नॅनो प्रकल्पामुळे आणि त्याच्या विरोधात ममतांनी केलेल्या आंदोलनामुळे लोकांच्या लक्षात राहिले आहे.

ममता बॅनर्जी या सध्या दक्षिण कोलकातामधील भवानीपोर मतदार संघाच्या आमदार आहेत. काही जणांनी पश्‍चिम बंगाल भाजपला विकण्याचा कट रचला आहे असेही त्यांनी नमूद केले. ज्यांनी पक्ष सोडला त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाची संधी मिळाली तरी बंगाल विकण्याचे स्वप्न त्यांना कधीच पुर्ण करता येणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.