Mamata Banerjee : मला कुठल्या पदाची लालसा नाही. मला खुर्चीही नकोय. मी केवळ केंद्रातील सत्तेवरून भाजपला हटवण्यास उत्सुक आहे, अशी राजकीय गर्जना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरूवारी केली. तृणमूल कॉंग्रेसच्या कोलकत्यातील प्रचार सभेत बोलताना ममतांनी (Mamata Banerjee) भाजपला एकप्रकारे आव्हान दिले. बंगालच्या निवडणुकीत आम्ही विजय मिळवू. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांना साथीला घेऊन दिल्ली जिंकू, असे भाष्य त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये भरघोस मतदान झाले. Mamata Banerjee त्याचा संदर्भ देऊन ममता म्हणाल्या, जनतेचे मन मला समजते. आजचे मतदान पाहता तृणमूल जिंकण्याच्या स्थितीत आहे. बंगालमध्ये मतदारयाद्यांची पडताळणी (एसआयआर) झाली. त्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदारांची नावे याद्यांमधून हटवण्यात आली. त्याचा निषेध करण्यासाठी मतदारांनी भरभरून मतदान केले, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे बंगालमधील मतदानावरून (Mamata Banerjee) तृणमूल आणि भाजपच्या गोटांतून दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील घवघवीत जनादेश सत्ताबदलाचे संकेत देतो, असे भाकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.