कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा देशातील करोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांना करोना विषाणूची लस देण्यात येईल, हा केंद्र सरकारचा दावा देखील लबाडीच आहे’ असा घणाघात केला.
“डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा दावा ही देखील एक लबाडीचं आहे. ते केवळ निरर्थक व पोकळ दावे करत असतात. केंद्राने सर्व राज्यांना लसींचा मोफत पुरवठा करायला हवा.” अशी मागणी देखील बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान, देशातील राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीच उपलब्ध होत नसल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवले आहे. केंद्र सरकारने, ‘जून महिन्याच्या मध्यापर्यंत लसी उपलब्ध होतील’ असे सांगितले आहे.
अशातच आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेबाबत भाष्य करताना, ‘१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहीम ही अनियंत्रित व अव्यवहार्य आहे’ अशा शब्दांमध्ये सुनावले.
That (vaccinating all citizens before Dec 2021) is just a hoax. They just say baseless things. The Centre is not sending vaccines to State govts. Centre should procure vaccines for States & give it free of cost to all: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/PetJKGkJz7
— ANI (@ANI) June 2, 2021