पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आपल्या प्रत्येक निवडणूक सभेद्वारे हे दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असून काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला होता. पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी, ‘मोदींना आपण लोकशाहीची थापड मारू’ असं वक्तव्य केलं होतं.
मात्र नंतर ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याचा ‘ममता बॅनर्जी मोदींना थापड मारू इच्छितात’ असा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील निवडणूक सभेमध्ये बोलताना, ‘ममता बॅनर्जी मला थापड मारू इच्छितात’ असं म्हंटल होतं.
दरम्यान, आता ममता बॅनर्जी या स्वतः आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगत असून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना थापड मारण्यात कोणतंही स्वारस्य नाही असं म्हणत आहेत. आपल्या वक्तव्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या,
“मी मोदींना थापड मरेन असं कधीही म्हणाले नव्हते. मी म्हणाले होते की आपण मोदींना लोकशाहीची चपराक देऊ. मी मोदींना थापड का मारेन? आणि जर मोदींना थापड मारली तर ते ५६ इंचाच्या छातीचे असल्याने माझाच हात मोडेल. मला ना तुम्हाला थापड मारण्यात स्वारस्य आहे ना तुम्हाला स्पर्श करण्यात.”
WB CM Mamata Banerjee in Basirhat: I didn't say that I will slap you (PM Modi) literally, I said I will give slap of democracy. Why would I slap you? If I slap you, my hand will break, then why should I? Your chest is 56 inch,how can I slap you? I don't want to slap or touch you. pic.twitter.com/YT6rdArX62
— ANI (@ANI) May 11, 2019