ममता बॅनर्जींसोबतच्या चर्चेनंतर कनिष्ठ डॉक्टर संप मागे घेणार ?

कोलकाता – ममता बॅनर्जीं यांच्या सोबतच्या चर्चेनंतर कोलकत्ता येथील कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांनी संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी रूग्णालयात तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

तसेच ममता बॅनर्जी यांच्या सोबत झालेल्या मुलाखतीनंतर कनिष्ठ डाॅक्टर एनआरएस मेडिकल काॅलेजमध्ये जाऊन यासंबंधी त्याचा निर्णय जाहीर करणार आहेत.

दरम्यान, कोलकात्यातील एनआरएस हॉस्पिटलमधील एका कनिष्ठ डॉक्टरवर १०जून रोजी झालेल्या हल्ल्यानंतर येथील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला होता. यामध्ये जवळापास 10 लाख डाॅक्टर सहभागी झाले होते. यामुळे राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमधील वैद्यकीय सवांचा खोळंबा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.