अखेर ममता बॅनर्जी यांचं धरणं आंदोलन मागे

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी अखेर आपलं धरणं आंदोलन मागे घेतलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय अटक करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. पण त्याचबरोबर,राजीव कुमार यांनी सीबीआयला सहकार्य करावं, असंही  सर्वोच्च न्यायालयाने  म्हटले आहे.

याबाबत बोलताना ‘भारत बचाओ’ आंदोलनाला बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी समाधान व्यक्त केले असून सर्वोच्च न्यायालयाद्वारे संजीव कुमार यांना अटक करण्याची गरज नसल्याचा निर्णय म्हणजे आमचा नैतिक विजय आहे असं त्या म्हणाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमचा नैतिक विजय दर्शवतो : ममता बॅनर्जी 

Leave A Reply

Your email address will not be published.