कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. “मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवेन,’ असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.
हुगळीतील देवबंदपूर येथील एका रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपवाल्यांनो तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक उमेदवार शोधू शकत नाही? त्यांच्याकडे आपला कोणताही स्थानिक उमेदवार नाही.’
निवडणूक लढवण्यासाठी टीएमसीकडून किंवा सीपीएमकडून लोक उधार घेतली आहेत. ती लोक पाण्यासारखा पैसा सोडत आहेत. जी लोक नीट सोनार बंगला बोलू शकत नाहीत, ते बंगालवर काय राज्य करणार?, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा