स्थलांतरितांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची ममतांचीही मागणी

कोलकाता: केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली आहे. अशीच मागणी कॉंग्रेसनेही आधी केली आहे. तथापि त्या दहा हजारांच्या मदतीनंतर पुढील किमान सहा महिने प्रत्येकी साडेसात हजार रुपयांची मदत देण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती.

ममतांनी मात्र या मजुरांना एकदाच दहा हजारांची मदत मिळाली तरी चालेल असे म्हटले आहे. मात्र सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात सरकारने केवळ स्थलांतरीत मजुरांनाच नव्हे तर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अशी मदत केली पाहिजे कारण हे लोक गेले काहीं महिने बिना रोजगार घरात बसून आहेत. त्यांच्यापुढे उपासमारीचा प्रसंग उद्‌भवला आहे. या मजुरांना मदत करण्यासाठी मोदींनी पीएमकेअर्सचा निधीही वापरायला हरकत नाही असेही त्यांनी सुचवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.