सावधान: सरकारने अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना केले सतर्क, ‘हे’ मालवेअर करु शकते तुमचे बँक खाते रिकामे

नवी दिल्ली – अँड्रॉइड फोन मध्ये बॅकिंग सेवांचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांना मालवेअरचा धोका असल्याचे दिसून येत आहे. सायबर सुरक्षा एजन्सी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीम ने इशारा दिली आहे की, मालवेअर अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांच्या ऑनलाइन बॅंकिंगशी निगडीत असलेली माहिती चोरत आहे. हॅकर्सने या मालवेअरच्या माध्यमांतून आतापर्यंत 27 पेक्षा जास्त बॅंकेच्या ग्राहकांना निशाना केले आहे.

नविन अँड्रॉइड मोबाईल बॅंकिंग मालवेरला ड्रिनिक म्हणतात. याचा वापर पाच वर्षापुर्वी होत होता. या बँकिंग ट्रोजनद्वारे, हॅकर्स वापरकर्त्यांच्या फोन स्क्रीनवर नजर ठेवतात व बॅंकिंगशी संबधीत माहिती चोरून घेतात.

व्हायरस फाईल इंस्टॉल झाल्यानंतर मालवेअर वापरकर्त्याकडून कॉल लॉग आणि इतर गोपनीय माहितीमध्ये प्रवेश करण्याचा परवाणगी मागतो. ही माहिती टाकल्यानंतर हॅकर्सला स्मार्टफोनचा पूर्ण अॅक्सेस मिळतो.

अशा प्रकारे चोरतात माहिती
वैयक्तिक माहिती टाकल्यानंतर संदेश येतो. यामध्ये आयकर परताव्याचे आमिष दिले जाते.
यास बळी पळून वापरकर्ता ट्रांसफरवर क्लिक करतो. यावेळी फोन अपडेट होत असल्याचे दिसून येते. मात्र असे होत नाही.
अपडेटच्या नावाखाली मालवेअर वापरकर्त्याच्या फोन मधील गोपनीय माहिती चोरून ती हॅकर्सला देतो. त्यानंतर हॅकर्स बॅंकेची बनावट पावती बनवून युजर्सच्या स्मार्टफोन पर्यंत पोहचवतो.
मग बनावट स्क्रीनमध्ये तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर खाते बॅंक हॅक होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.