मल्ल्याचा राजेशाही महाल रडारखाली

लंडन : मद्य सम्राट विजय मल्ल्या याचा 17 बेडरूम, स्वतंत्र हेलीपॅड आणि स्वत:चा नाईट क्‍लब असणारा राजेशाही महल आता न्यायालयाच्या रडारवर आला आहे. कर्ज थकवल्या प्रकरणी मल्ल्याच्या या बढाईखोर महालावर एका बॅंकेने आक्षेप घेतला आहे.

माजी अब्जोपतीने आपल्या बॅंकेचे कर्ज थकवल्याचा अरोप या बॅंकेने केला आहे. ली ग्रांड जार्डीन हा राजेशाही महाल मल्ल्याने त्याची कंपनी गिझ्मो इन्व्हेस्ट द. अफ्रिकामार्फत 2008 मध्ये खरेदी केला. त्यासाठी या कंपनीने कतार राष्ट्रीय बॅंकेची शाखा असणाऱ्या अन्सबार्चर आणि कंपनीने वित्त पुरवठा केला होता. मात्र त्यानंतर गिझ्मोने हे कर्ज थकवल्याचा आरोप या बॅंकेने केला आहे. ही माहिती न्यायालयात 15 जानेवारीला देण्यात आली.

बॅंकेने त्याची 50 मिटर बोट विकावी यासाठी मल्ल्याला भाग पाडावे, अशी मागणी केली आहे. किंवा 50 लाख युरोसाठी ही बोट तारण ठेवावी,असे यात म्हटले आहे. त्याची ही बोट कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्याने विमा कंपनीने जप्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here