Mallikarjun Kharge On Narendra Modi – ‘पंतप्रधान मोदी म्हणजे झुठों का सरदार आहेत’ अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. त्यांना देशाची सारी लोकशाही प्रक्रियाच संपवायची आहे असे त्यांनी आज त्यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना सांगितले. लोक आता भाजपच्या या खोटारडेपणाच्या कारभाराला कंटाळले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
“मोदी, मोदी’ म्हणणारे काही लोक आहेत. हा माणूस खोटारड्या लोकांचा सरदार आहे, तरीही तुम्ही ‘मोदी मोदी’ करता असा सवाल खर्गे यांनी यावेळी केला. मला कोणाला शिवीगाळ करायची नाही आणि मी मोदींच्या विरोधात नाही.
पण मी नक्कीच मोदींच्या विचारसरणीच्या विरोधात आहे आणि त्याविरोधात लढत राहीन असे ते म्हणाले. मोदी स्वताला हुशार म्हणवत असले तरी या देशातील लोक मोदींपेक्षा हुशार आहेत.
ते मोदींची अधिकारशाही चालवून घेणार नाहीत असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सध्याची निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांतील लढाई नसून ती मोदी विरूद्ध जनता अशी लढाई बनली आहे असे त्यांनी सांगितले.