मलिक याचा निवृत्त होण्याचा निर्णय योग्यच – सानिया मिर्झा

लंडन – पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्‍वचषक स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे त्याने स्पर्धेपूर्वी संकेत दिले होते. या स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. टी-20 सामन्यांमध्ये मात्र काही काळ तो खेळणार आहे.

मलिकची पत्नी व भारताची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडूच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या मर्यादा असतात. मलिक याचा निवृत्त होण्याचा निर्णय योग्यच आहे. त्याने वीस वर्षे क्रिकेटद्वारे देशाची सेवा केली आहे. त्याला आता घरासाठी वेळ देता येईल’.

Leave A Reply

Your email address will not be published.