तब्बल तीन तासानंतर झाली मतमोजणीला सुरुवात
बारामती – माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीचे काम आज (दि. २४) बारामतीतील जयश्री गार्डन या ठिकाणी होणार आहे. मात्र ही मतमोजणी सुरु होण्याअगोदरच संशयाच्या भोवर्यात सापडली होती.
मतमोजणीच्या ठिकाणी चार अनोळखी व्यक्ती आढळले होते. त्यामुळे सदर मतमोजणी संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. दरम्यान, आता तब्बल तीन तासांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवारत झाली आहे.
तसेच, यावेळी सरकार शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी ‘जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात करू देणार नाही’, असा पवित्रा तावरे यांनी घेतला होता.