बारामती – प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचे निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. सध्या गट क्रमांक १ माळेगावमधील सर्व १२ फेऱ्यांची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून मतांची बेरीज होणं बाकी असल्याचे वृत्त आहे. माळेगावनंतर पणदरे गटाची मोजणी होईल.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल विरोधात सहकार बचाव पॅनल अशी थेट लढत आहे. आज सकाळी मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच मतमोजणी स्थळावर चार अनोळखी इसम आढळल्याच्या संशयावरून संभ्रम निर्माण झाला होता.