“माळेगाव’चे अध्यक्ष तावरेंचा अंतरिम जामीन मंजूर

बारामती- माळेगाव येथील शरद पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश लोखंडे यांच्या न्यायालयात अटकपूर्व अंतरिम जामीन सोमवार (दि. 27) पर्यंत मंजूर करण्यात आला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्यावर तक्रारदार सुरेश खलाटे यांच्या तक्रारीनुसार शरद पतसंस्थेत अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने रंजनकुमार तावरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. बुधवारी (दि. 22) येथील जिल्हा सत्र न्यायालय तावरे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ऍड. सुधीर शहा, ऍड. विजयसिंह मोरे, ऍड. शाम कोकरे यांनी ही माहिती दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here