#MalaysiaMasters2020 : साईना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल

क्वालांलपूर : लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या साईना नेहवाल हिने गुरूवारी दक्षिण कोरियाच्या ऑन से यंगचा पराभव मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

स्पर्धेच्या दुस-या फेरीत साईनाने ऑन  से यंगचा २५-२३, २१-१२ असा पराभव केला. ही लढत ३९ मिनिटे चालली. साईना जागतिक क्रमवारीत ११ व्या तर अॅन से यंग ९ व्या स्थानावर आहे. यंग हिने गेल्या मोसमातील फ्रेंच ओपनमध्ये साईनाला नमविले होते.

साईनाची उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन कैरोलिना मारिनविरूध्द लढत होईल. दरम्यान, पहिल्या लढतीत साईना नेहवालने बेल्जियमच्या लिऑन टॅनला २१-१५, २१-१७ असे नमविले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.