#MalaysiaMasters2020 : साईना पाठोपाठ पी.व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

क्वालालंपूर : भारतीय बॅडमिंटनपटू साईना नेहवाल पाठोपाठ पी.व्ही. सिंधूने देखील मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने जपानच्या अया ओहोरीचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणा-या सिंधूने स्पर्धेच्या दुस-या फेरीत अया ओहोरीचा २१-१०, २१-१५ असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली. अयाविरूध्दच्या लढतीत सिंधूचा हा ९ वा विजय ठरला. गेल्या मोसमात सिंधूला काही स्पर्धांमध्ये पहिल्या-दुस-या फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता, त्यामुळे नव्या मोसमात सा-यांचे लक्ष तिच्या कामगिरीवर आहे.

दरम्यान, पहिल्या फेरीत सिंधूने रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्स्कायावर २१-१५, २१-१३ अशी ३५ मिनिटांत मात करून विजयी सलामी दिली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.