क्वालालंपूर : सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला जापानचा बॅडमिंटनपटू केंतो मोमोता याने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे.
PERODUA Malaysia Masters 2020
MS – Final
24 21 🇯🇵Kento MOMOTA🏅
22 11 🇩🇰Viktor AXELSEN🕗 in 54 minutes
https://t.co/ZgGkk2NLBD— BWFScore (@BWFScore) January 12, 2020
स्पर्धेतील अंतिम सामन्यात मोमोताने डेनमार्कच्या विक्टर एक्सेलसनचा २४-२२, २१-११ असा पराभव केला. ही लढत ५४ मिनिटे चालली. विक्टर एक्सेलन हा जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. दोघांच्या मध्ये आतापर्यंत १५ सामने झाले आहेत, यामध्ये मोमोताने १४ वेळा एक्सेलसनला पराभूत केलं आहे.
दरम्यान, मोमोताने पहिल्या फेरीत भारताच्या पारूपल्ली कश्यप आणि दुस-या फेरीत एचएस प्रणाॅयचा पराभव केला होता. याआधी मोमाताने डिसेंबर २०१९ मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावलं होते, जे त्याचे २०१९ मधील ११ वे विजेतेपद होते.