बँकाॅक : सैयद अजीजच्या नाबाद अर्धशतकी खेळीनंतर शरविन मुनियंडीनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मलेशियाने एसीसी ईस्टर्न रिजन टी-२० मालिकेतील सामन्यात नेपाळचा २२ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. शरविन मुनियंडी सामन्याचा मानकरी ठरला.
Malaysia win!
Sharvin Muniandy takes 3 wickets in the final over to bowl out Nepal for 132 in 19.5 overs and seal a stunning 22-run win! #MALvNEP #ERT20 #RoadToAsiaCup2020 pic.twitter.com/mTfzrBQ7ox
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 29, 2020
मलेशियाने विजयासाठी दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा डाव १९.५ षटकांत १३२ धावसंख्येवरच आटोपला. नेपाळकडून ज्ञानेंद्र मल्लाने ३८(३३), दीपेंद्र सिंह ऐरीने ३८(४०) आणि पवन शराफने १९(१४) धावांची खेळी केली.
मलेशियाकडून गोलंदाजीत शरविन मुनियंडीने सर्वाधिक ४ तर पवनदीप सिंह, स्याजरूल इद्रस आणि खिजर हयातने प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, मलेशियाने प्रथम फलंदाजी करताना सैयद अजीजच्या नाबाद ५१(३५), अनवर अरूदीनच्या ३१(२९), अहमद फैजच्या ३०(२६) आणि अमीनुद्दीन रामलीच्या २९(२८) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५४ धावा केल्या होत्या.
नेपाळकडून गोलंदाजीत संदीप लामिछाने याने ३, अविनाश बोहराने २ तर करन केसीने १ गडी बाद केला.