क्वालालंपूर – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व पुरुष गटातील अव्वल खेळाडू एच. एस. प्रणॉय यांनी येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
उपउपांत्यपूर्वी फेरीच्या गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने थायलंडच्या पत्तीयापोन चाइवानवर 19-21, 21-9, 21-14 अशी केवळ 57 मिनिटांत तीन गेममध्ये मात केली. आता सिंधूची पुढील लढत तैपेयीच्या ताईत्झु यिंगशी होणार आहे. प्रणॉयने तैपेयीच्या चाऊ तियान चेन याचा 21-15, 21-7 असा सहज पराभव केला.