जम्मू काश्मीरबाबत मलालाने दिली ‘ही’ भावनिक प्रतिक्रिया

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे भारतात जल्लोशात स्वागत करण्यात आहे. तर जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या बाबतीत सरकारने घेतलेला निर्णय काही जणांना रुचत आहे तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र या निर्णयामुळे जम्मू काश्मीरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावर पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ती तसेच “शांततेचे नोबेल’ मिळालेल्या मलाला युसुफजाईने सुद्धा ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शांत व्यवस्था बनविण्याचे आव्हान केले आहे.


मलाला युसुफजाईने ट्विट केले आहे की,’काश्मीरी जनता त्या वेळेपासून संघर्ष बघत आहे. जेव्हा मी लहान होते. तसेच माझे आई-वडीलही लहान होते. आणि माझे आजी आजोबा तरुण होते. माझं मत आहे की सात दशकापासून चालत आलेल्या जम्मू काश्मीर समस्येवर शांतीपूर्ण मार्गाने उपाय काढायला हवा.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.