मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा 2 एप्रिल रोजी गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर मलायका अरोराला उपचारासाठी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका एका शूटवरून पुण्याहून मुंबईला परत येताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आणि ही घटना घडली.
या अपघातात मलायका किरकोळ दुखापत झाली. आता तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तेव्हापासून ती घरीच आराम करत आहे. पण आता बऱ्याच दिवसांनी तीने तीच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. सध्या मालकायची ही खूपच व्हायरल झाली आहे.या पोस्टमध्ये तीने डॉक्टर, कुटुंब आणि इतरांचे त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
View this post on Instagram
आपल्या पोस्ट मलायका भावुक होऊन म्हणते की…., “गेले काही दिवस आणि ज्या घटना घडल्या आहेत त्या खूपच धक्कादायक होत्या. भूतकाळात विचार करणे हे एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्यासारखे वाटते आणि प्रत्यक्षात घडलेले काही नाही असंच वाटत आहे. या अपघातनंतर मला असे वाटले की एका शक्ती माझे रक्षण करत आहे.
मला रुग्णालयात पोहोचण्यास मदत करणारे लोक असोत, माझे कुटुंब असो जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि रुग्णालयातील कर्मचारी असो. माझ्या डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीत शक्य तितक्या काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आता मला बरे वाटत आहे. आणि शेवटी माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेले प्रेमाबद्दल मी आभारी आहे.” या आशयाची पोस्ट अभिनेत्री मलायका अरोराण तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.