मुंबई- बाॅलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टीव असते. त्यावर अनेक फोटो, व्हीडियो शेअर करत असते. अनेक चाहते तिचे हे व्हीडियो पाहण्यासाठी आतूर असतात. नुकताच 47 वा वाढदिवस साजरा केला.
मलायका तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्स अनेक चाहत्यांना आवडतो. नुकताच मलायकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सन किसचा फोटो शेअर केला आहे. सुर्याचे किरणं अंगावर घेत असलेल्या या फोटोला चाहत्यांकडून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
माझी सकाळ सुंदर आहे, अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट्स करत आहे. या फोटोवर चाहत्यांनीच नाही तर बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात फराह खानने दिलेली कमेंट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. “वाह, मेरी गोल्डन गर्ल.” अशी कमेंट फराहने मलायकाच्या फोटोला केली आहे.