Malaika Arora | Karisma Kapoor – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या हटके लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे. तिचा सोशल मीडियावर स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग असून, फॅशन तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.
मलायका अरोरा हिने नुकताच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टसोबतच मलायका अरोरा हिने काही खास फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही लेट नाईट पार्टी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत खास पार्टी करताना दिसतंय.
View this post on Instagram
अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. मलायका अरोरा हिने हे लेट नाईट पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. मलायका अरोरा हिने लिहिले की, खूप सुंदर अशी 50 वर्ष पूर्ण केली आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…तुझ्यावर खूप सारे प्रेम करतो…’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. करिश्मा आणि मलायका अरोरा चांगल्या मैत्रिणी आहेत.
दरम्यान, मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका-अर्जुन एकत्र आहेत. मात्र यादरम्यान त्यांच्या बऱ्याचदा ब्रेकअपच्या अफवा देखील समोर आल्या.
अभिनेत्री मलायकाला छैय्या छैय्या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.