पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळच्या “मन की बात’मध्ये “फिट इंडिया मुव्हमेंट’ बाबत चर्चा केली होती. देशात स्वास्थ्य असावे, यासाठी व्यायामामध्ये तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मलायका अरोराने आपला स्वतःचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
या व्हिडीओमध्ये मलायकाने मोदी आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचे कौतुक केले आहे आणि या अभियानामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावे, असे सर्वांन आवाहनही केले आहे. बॉलीवुडमध्ये मालायका आपल्या फिटनेससाठी विशेष जागरूक म्हणून ओळखली जाते. मलायका एकाही दिवशी जिममध्ये जायला दांडी मारत नाही. ती अनेकदा जिमच्या बाहेरच्या आढळून आली आहे. जेंव्हा जेंव्हाही तिला वेळ मिळतो, तेंव्हा ती एक्सरसाइज, योग आणि मेडिटेशन करत असते. याचमुळे वयाच्या 45 व्या वर्षीही ती 25 वर्षाच्या ऍक्ट्रेससारखी फिट आहे.
ती नेहमीच आपले फिटनेस एक्सरसाइजचे व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या या व्यायामाच्या सवयी तिचे फॅन फॉलो करत असतात. त्यावरून तिच्या फोटो आणि व्हिडीओवर खूप कॉमेंटही पडत असतत. मलायकाने सर्व देशवासियांना “फिट इंडिया मुव्हमेंट’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून आपल्या या सक्रियतेमध्ये एक् पाऊल पुढे टाकले आहे.