मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा 2 एप्रिल रोजी गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर मलायका अरोराला उपचारासाठी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका एका शूटवरून पुण्याहून मुंबईला परत येताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आणि ही घटना घडली.
या अपघातात मलायका किरकोळ दुखापत झाली. आता तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तेव्हापासून ती घरीच आराम करत आहे. पण या प्रसंगानंतर मलायकाने काही दिवस सोशल मिडीयाकडे जणू पाठच फिरवली होती. मात्र, पुन्हा एकदा मालयकाने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे.
यामध्ये तिने ब्लॅक कलरचा टॉप आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसत आहे. तिचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना तिने ‘हिलिंग’ असे कॅप्शन दिले आहे. हीलिंग म्हणजेच ती अजूनही उपचार घेत आहे.
मालकाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सने कमेंट आणि लाईक्स केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालयकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहत तिने डॉक्टर, कुटुंब आणि इतरांचे तिच्या काळजीबद्दल आभार मानले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.