मुंबई – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कपल अनेकदा मीडियामध्ये चर्चेत असते. कधी ते सोबत जिमला जाताना दिसतात तर कधी मालदीव सारख्या ठिकाणी एकत्र सुट्ट्या घालवतात. सध्या दोघांच्याही डान्सचा व्हिडीओ जोरात व्हायरल होतोय. विशेष म्हणजे दोघेही मलायका आरोराने एकेकाळी डान्स केलेल्या गाण्यावरच नाचत आहेत.
शाहरुख खानसोबत मलायकाने ‘चले छय्या छय्या’ या गाण्यावर केलेलं आयटम सॉंग चांगलेच हिट झाले होते. अर्जुन कपूरने देखील मलायकासोबत याच गाण्यावर ठेका धरला आहे. निमित्त होते प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणार रावल आणि अर्पिता मेहता यांच्या प्री-वेडिंग पार्टीचे. दोघेंनी यावेळी गाण्यावर पब लाईटमध्ये डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
मानव मंगलानीने या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून त्यांचे चाहते खूप खुश झाल्याचे समजते. विशेष म्हणजे मलायकाने त्याच जोशात छय्या छय्याच्या तालावर ठेका धरलाय. सोबत अर्जुन कपूरनेही शाहरुख खानप्रमाणे डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.