मलायका-अर्जुनच्या 19 एप्रिलला लग्नाला या

गेले वर्ष- दीड वर्षभर मलायका आणि अर्जुन कपूरच्या अफेअरची खमंग चर्चा रंगली होती. आता त्या चर्चेचा शेवट करण्याची वेळ आली आहे. इतके दिवस नुसते अफेअर चालले होते. मात्र आता मलायका आणि अर्जुनचे लग्न ठरले आहे. आणखी महिन्याभराने म्हणजे 19 एप्रिलला मलायका आणि अर्जुन कपूर विवाहबद्ध होणार आहेत. अगदी निकटचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा होणार आहे.

हे लग्न चर्चमध्ये होणार आहे, असेही बोलले जात आहे. पण मलायकाच्या मते ही एक अफवा आहे. विवाह पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मात्र त्यात गाजावाजा असणार नाही. फारच निवडक लोकांची गेस्ट लीस्ट तयार केली गेली आहे. त्यात मलायकाच्या खास मैत्रिणी आवर्जुन येणार आहेत. बॉलीवूडमधील तिच्या मैत्रिणींमध्ये करिना आणि करिष्मा कपूर या भगिनी आवर्जुन असणार आहेत. तर अर्जुन कपूरच्या बाजूने रणवीर-दीपिका हे दाम्पत्यदेखील आवर्जुन येणार आहे. अन्य पाहुण्यांच्या बरोबर करण जोहरचे नावही अग्रस्थानी आहे.

अर्जुन आणि मलायकाने आपल्या मित्रांना पुढच्या महिन्याची 19 तारीख रिकामी ठेवायला आगोदरच सांगितले होते. तेंव्हाच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघाला असल्याचे लक्षात आले होते. एवढेच नव्हे तर लग्नाशी संबंधित कोणताही तपशील मीडियाला सांगायचा नाही, असा सज्जड दमही त्या दोघांनी आपापल्या फ्रेंडसर्कलला दिला होता. त्यामुळेच लग्नाचे ठिकाण आणि बाकीचा तपशील अद्याप मीडियापर्यंत पोहोचलेला नाही. आता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी हा तपशील कोणालाही समजणार नाही, अशी काळजी घेतली जाईल. त्यानंतर थेट लग्नाच्या काही दिवस अगोदर हे वेडिंग डेस्टिनेशन काय असेल, हे समजेल. हे ठिकाण कोणतेही असो, पण लग्नाला आवर्जुन या…!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)