Malad building collapse : विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं मालाड दुर्घटनेचं कारण

मुंबई – शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. असे असाताना आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील मालाडमध्ये रहिवासी चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये ८ लहान बालकांचा समावेश आहे. न्यू कलेक्टर कंपाऊंड मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

मुंबईत रहिवासी इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू, ८ चिमुकल्यांच्या समावेश

दरम्यान, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.