आमदारांकडून मनसे संपवण्याचा प्रयत्न

मकरंद पाटे : अतुल बेनकेंच्या प्रचारार्थ नारायणगावात मतदारांशी साधला संवाद

नारायणगाव – विद्यमान आमदार मनसेच्या तिकिटावर निवडून आले; परंतु पाच वर्षांत त्यांनी पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला, आता मनसेचे कार्यकर्ते पेटून उठले आहे. स्वार्थासाठी पक्षाचा वापर करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना योग्य ती जागा दाखवून महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करणार, असा विश्‍वास मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी व्यक्‍त केला.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ नारायणगाव शहरात मतदार भेट दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना पाटे बोलत होते. यावेळी उमेदवार अतुल बेनके, गुलाब नेहरकर, सुजित खैरे, वैभव तांबे, राजश्री बोरकर, सुरज वाजगे, गणेश वाजगे, जयेश कोकणे, अरविंद लंबे, रोहिदास केदारी, संतोष पाटे, महेश वालझाडे, शशिभाऊ वाजगे, मनसेचे साईनाथ ढमढेरे, दिलीप खिलारी, विजय बुट्टे पाटील, आशिष थोरवे, दीपक गुंजाळ, विकास मोरे, केतन घाडगे, नंदकिशोर जगताप, सुशांत घाडगे, आदी उपस्थित होते.

मकरंद पाटे म्हणाले की, मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मनसे “फॅक्‍टर’ अतुल बेनके यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

“लोकप्रतिनिधींच्या घोटाळ्याचे पुरावे माझ्याकडे’ – स्वनिधीच्या नावाखाली लोकप्रतिनिधींनी कामे केली; परंतु केलेल्या कामांवर शासनाचा खर्च टाकून रक्‍कम काढून घेतली. खेड ते आळेफाटा या रस्त्याचे चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीला महसूल विभागाने केलेल्या दंड प्रकरणात आमदारांनी हस्तक्षेप केला आणि त्या दंडाची रक्‍कम कमी करून घेतली.

त्या मोबदल्यात कंपनीकडून मोफत रस्ते ठिकठिकाणी करून घेतले, आणि मोफत केलेल्या रस्त्यावर निधी टाकून शासनाकडून सुमारे 70 लाख रूपये लाटले. असा महाघोटाळा करून या लोकप्रतिनिधींनी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली आहे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे उमेदवार अतुल बेनके यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.