मकरंद अनासपूरे-सिद्धार्थ जाधवची जोडगोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखले जाते. प्रेक्षक नेहमी महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता महेश लवकरच दे धक्का या चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘दे धक्का-2’ असे आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

 

View this post on Instagram

 

दे धक्का २ 03 Jan 2020

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on Jul 23, 2019 at 11:10pm PDT

नुकताच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दे धक्का-2 चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव लंडनच्या रस्त्यावर बंद पडलेल्या कारमध्ये बसलेले पाहायला मिळतायेत. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ‘वेलकम टू लंडन’ असे म्हटले आहे. त्यामुळे चित्रपटाचे महत्त्वाचे कनेक्‍शन लंडनशी असणार हे कळते आहे. तसेच हा चित्रपट 3 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)