पी.के इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा

पिंपरी – शाडूच्या मातीपासून स्वत:च्या हाताने बनवलेली आकर्षक गणरायांची मूर्तीचीच घरात प्रतिष्ठापना करू, असा संकल्प आज पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील पी.के इंटरनॅशनल स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी केला. दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमामध्ये प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणरायाची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण घेतले.

या कार्यशाळेमध्ये शाळेमधील इयत्ता 7 वी, 8 वी व 9 वीच्या 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिल्पकार नितीन ठाकरे व त्यांच्या टीमने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे विविध टप्प्यात अगदी कमी वेळेत आकर्षक आणि सुंदर अशी गणरायाची मूर्ती बनवली. अगदी कमी वेळेत केलेली गणरायाची मूर्ती पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता याच मूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प बोलून दाखवला व इतरांनाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसविण्याचे आवाहन केले.

यावेळी दैनिक प्रभातचे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, प्रशासकीय व्यवस्थापक प्रवीण थूल व पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे व्यवस्थापक शिरीष समुद्र यांनी पी. के इंटरनॅशनल स्कूलने उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल शाळेचे संस्थापक चेअरमन जगन्नाथ काटे यांना मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता परळ, सविता आंबेकर, शिल्पा गायकवाड, निर्मला द्विवेदी, कातिकला गायकवाड, राहुल पोरे, राखी पोरेल, सयाजी शिंदे, शितल पाटील, अंकिता बेनाके, माधुरी निकम, पूजा राठोड, स्वाती दुरगुडे आदींची उपस्थिती होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.