‘चीनमधून आयात शेतीमाल विषाणूमुक्‍त असल्याची खात्री करा’

पुणे – चीन येथून आयात होणारा शेतीमाल करोना विषाणूमुक्‍त असल्याची खात्री करूनच विक्री करावी, अशा सूचना आडते आणि व्यापाऱ्यांना बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये करोना विषाणुमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतामध्येही भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने परिपत्रक काढले आहे. चीनमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव आहे. चीनमधून पुणे बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी अनेक प्रकारची फळे, भाजीपाला येतो. हा सर्व शेतीमाल करोना विषाणूमुक्‍त असल्याची तपासणी अन्न आणि भेसळ, औषध प्रशासन या विभागाकडून संबंधित आडते आणि व्यापाऱ्यांनी करावी. संबंधित शेतीमाल करोना विषाणुक्‍त असल्याचे प्रमाणपत्र फळे आणि भाजीपाला विभागाला सादर केल्यानंतरच शेतीमालाची विक्री करण्यात यावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत.

चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आहे. तो भारतात येऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. चीन येथून येथील बाजारात फळे आणि भाजीपाल्याची आवक होत असते. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून करोना विषाणुक्‍त फळे व भाजीपाला असल्याचे प्रमाणपत्र संबंधित आडते आणि व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे.
– बी.जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.