बारामती – 2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशपातळीवरील सर्व भाजपविरोधकांनी एकत्र यावे. आणि शरद पवार यांना “यूपीए’चे अध्यक्ष करा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, भाजपाला 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी देशातील भाजपा विरोधात वज्रमूठ एकजूट करण्यासाठी हेमंत पाटील हे पुढे येऊन करणार आहेत. याबाबतीत हेमंत पाटील हे शरद पवार यांना भेटून आले आहेत. पवार यांच्याकडे पुढील 2024 चा अजेंडा ठरलेला आहे. देशातील 10 मुख्यमंत्री हे दिल्लीत एक बैठक आयोजित करणार आहेत. याबाबतीत ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे.
उत्तर प्रदेशातील बीएसपीचे राष्ट्रीय अध्यक्षा मायावती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बोलणी चालू असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. हिंदु महासभेच्या एका गटाने शरद पवारांचे नेतृत्व मान्य केले आहे. आपचे अरविंद केजरीवाल यांनी सकारात्मक भूमिका मान्य केली आहे.