दिल्ली सरकारची केंद्र सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : कांद्याच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेता आयात केलेला कांदा 60 रुपयांऐवजी 15 रूपये 60 पैशांनी द्यावा, आप वितरण केंद्राद्वारे तो स्वयंपाक घरार्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल, अशी विनंती दिल्ली सरकारच्या वतीने केंद्र सरकारला करण्यात आली.
केंदीय मंत्री राम विलास पासवान यांना दिल्लीचे अन्न धान्य वितरण मंत्री इम्रान हुसेन यांनी पत्र पाठवले. त्यात जीवनावश्यक बाबीत सरकारची भूमिका नफा कमावण्याची भूमिका नसावी, अशी भुमिका त्यांनी या पत्रात मांडली आहे.
नॅशनल ऍग्रिकल्चर को- ऑप मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (नाफेड) कांद्याचा पुरवठा थांबवला आहे. अलवार येथील बाजारपेठेतून खरेदी केल्यानंतर तो दिल्ली सरकारला द्यायला हवा होता. त्याऐवजी इजिप्तमधूमन तो आयात करण्यात आला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.