Sharad Pawar | Maharashtra Assembly Election 2024 – एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधे सुधे पाडायचे नाही. जोरात पाडायचे पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते टेंभूर्णी येथील प्रचार सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार महिलांविरोधी आहे, तरुणांविरोधी आहे, शेतकऱ्यांविरोधी आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही. हे सगळे बदलायचे असेल तर सरकार बदलले पाहिजे. महागाईमुळे महिलांना घरचे प्रपंच चालवणे कठीण झाले आहे.
दैनंदिन जीवनातील सामानावर सरकारने प्रचंड कर लावले आहे. या सगळ्या गोष्टींचा सामान्य माणसांना त्रास होतोय. यातून सामान्य माणसाची सुटका करायची असेल तर एकच काम तुम्ही करा आणि ते काम उद्याच्या 20 तारखेला करायचा आहे. ते काम करायचे असेल तर उद्याच्या 20 तारखेला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. अलीकडच्या काळामध्ये या तालुक्या बद्दल बाहेर अधिक चर्चा आहे. एकेकाळी हा तालुका दुष्काळी तालुका होता. मी स्वतः या ठिकाणी आमदार होतो तेव्हा अनेकदा आलो होतो.
त्यावेळेला मोरे नावाचे गृहस्थ आमदार होते. लाल टोपी घालायची आणि त्यानंतर रावसाहेब आमदार झाले. त्या सगळ्या काळामध्ये इथे आलो तर पहिली चर्चा व्हायची, दुष्काळासाठी काम द्या. त्याऐवजी काही मागणीच नसायची.
लोकांनी त्या संकटाच्या काळामध्ये कष्ट केले, घाम गाळला आणि आपला प्रपंच चालवला. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आम्ही सगळे प्रमुख लोक बसलो आणि पाण्याची दुखणं सोडवल्याशिवाय हा तालुका सुधारणार नाही ही गोष्ट आम्ही लोकांनी स्वीकारली.
ज्यांचे हात स्वच्छ ते घाबरत नाहीत
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसते. मला देखील ईडीची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली.
मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडले, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.