अशी बनवा घरगुती स्वादिष्ट गाजर बर्फी

पुणे – थंडीच्या दिवसात गाजर (carrot barfi) मुबलक प्रमाणात मिळतात. या दिवसात ते आरोग्यासाठीही चांगले असतात. या दिवसात मग विशेषत: गाजराचा (carrot barfi) हलवा केला जातो. याच धर्तीवर आपण गाजर बर्फी कशी बनवावी ते पाहुया.

साहित्य : गाजर (carrot barfi) – 500 ग्राम क्रीम दुध – 1 लिटर वेलची – 5 ते 6 तूप – 100 ग्राम साखर – 250 ग्राम किंवा आवश्‍यकतेनुसार काजू – 50 ग्राम

कृती : – सर्वप्रथम गाजर (carrot barfi) चांगले धूवून घेऊन त्याचा बारीक खीस करून घ्या. त्यानंतर वेलची बारीक करून त्याची पावडर करून घ्या आणि काजूचेही बारीक तुकडे करून घ्या. एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा. दुध गरम झाले की त्यात गाजराचा(carrot barfi)  खीस टाका व दुध पूर्ण आटेपर्यंत ते शिजू द्या. मधून मधून त्या मिश्रणाला ढवळत राहा, जेणेकरून गाजर भांड्याच्या बुडाशी लागणार नाही.

गाजरा(carrot barfi)चे हे मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यात वेलची पावडर, निम्मे काजूचे काप व तूप टाकून निरंतर ढवळत थोड्यावेळ शिजू द्या. आता त्यात साखर घाला व चांगले एकत्रित करा. साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळत राहा.

दरम्यान एका डिशला थोडेसे तूप लाऊन गुळगुळीत करा. मिश्रण चांगले घट्ट झाले की ते या डिशमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा. त्यानंतर ते थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाले की चाकूच्या मदतीने त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा. तुमची गाजर बर्फी (carrot barfi) तयार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.