अन्न-औषध वितरणाला सर्वोच्च प्राधान्य द्या – देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) – करोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार मुंबई भाजपाने केला. ही मदत करताना अन्न आणि औषधी याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुंबई प्रदेश भाजपाचे जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांसोबत पहिल्या संवादसेतूच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि अन्य नेते सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण 20 लाख नागरिकांपर्यंत सेवाकार्य पोहोचविण्याचे ठरविले असले तरी केंद्राकडून 50 लाख गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात मुंबईने 10 लाखांचे उद्दिष्ट गाठायचे आहे.

आज कुठे काय होतेय किंवा कुठे काय कमतरता आहे, याकडे लक्ष न देता ही आपली जबाबदारी आहे, हे समजून प्रत्येक भाजपा कार्यकत्र्याने स्वत:ला झोकून देण्याची नितांत गरज आहे. संपूर्ण देश हा आपला एक परिवार आहे आणि प्रत्येकाला या राष्ट्रकार्यात योगदान द्यायचे आहे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.